(Source: Poll of Polls)
ZIM vs IND: शुभमन गिलचं शतक, ईशान किशनचं अर्धशतक; भारताचं झिम्बाब्वेसमोर 290 धावांचं आव्हान
India tour of Zimbabwe: शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार शतक आणि इशान किशनच्या (Ishan Kishan) अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 290 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
India tour of Zimbabwe: शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार शतक आणि इशान किशनच्या (Ishan Kishan) अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वे समोर 290 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) झिम्बाब्वेच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय सघानं 50 षटकात आठ विकेट्स गमावून 287 धावा केल्या. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका अगोदरच खिशात घातलीय. तसेच तिसरा सामना जिंकून झिम्बाब्वेच्या संघाला क्लीन स्पीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांचं कंबरड मोडणाऱ्या दिपक चहर आज कशी कामगिरी बजावतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला. ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 82 चेंडूत त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक पूर्ण केलं. या सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना शुभमन गिल बाद झाला. या सामन्यात भारतानं 50 षटकात आठ विकेट्स गमावून 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलनं 130 धावांची खेळी केली. ज्यात 15 षटकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. दरम्यान, झिम्बाब्वेच्या ब्रॅडली इवांसनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं 10 षटकात 54 धावा खर्च करून भारताच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलंय.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान.
झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
ताकूदझ्वँनशी केईतानो, इनोसंट काया, टोनी मुनयोंगो, रेगीस चकाब्वा (कर्णधार), सिकंदर रझा, सिम विल्यम्स, रायन बुर्ल, ल्यूक जाँगवे, ब्रॅडली इवांस, व्हिक्टर एनवायुची, रिचर्ड येनगारावा.
हे देखील वाचा-