एक्स्प्लोर
IND vs ZIM, 3rd ODI Result : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिकाही जिंकली, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs ZIM, Match Highlights : भारताने झिम्बाब्वे दौऱ्यातील तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका 3-0 च्या फरकाने खिशात घातली आहे.
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 13 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर शुभमनच्या शतकाच्या जोरावर भारताने 290 धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेला दिले. त्यानंतर झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने अप्रतिम शतक ठोकत साऱ्यांचीच मनं जिंकली. शतक ठोकत त्याने संघाला अगदी विजयाजवळ आणलं पण काही धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे पराभूत झाला आहे. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs ZIM 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे. भारताने फलंदाजीत दम दाखवला पण गोलंदाजीतही अखेरच्या षटकात कमाल केली.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने आधी 289 धावा केल्या. ज्यामुळे विजयासाठी झिम्बाब्वेला 50 षटकात 290 धावा करायच्या होत्या. पण भारताने हे करु न दिल्याने सामना झिम्बाब्वे 13 धावांनी पराभूत झाला.
- सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत प्रथम भारताने फलंदाजी घेतली.
- सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी केली.
- राहुल-धवन बाद झाल्यानवर गिल आणि ईशानने डाव सावरत 140 धावांची शतकी भागिदारी केली.
- ईशान 50 धावा करुन बाद झाला तर शुभमनने कारकिर्दीतील पहिले शतक ठोकत 130 रन केले.
- 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
- पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन 45 धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.
- 49 व्या षटकात सिकंदर 115 धावा करुन बाद झाला. त्याने 95 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पण शार्दूलने त्याला 49 व्या षटकात शुभमनच्या हाती झेलबाद करवलं.
- त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असं वाटत होतं, पण आवेशनं अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव 276 धावांवर रोखत भारताला 13 धावांनी विजयी करुन दिलं.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement