ZIM vs IND, 2nd ODI LIVE Updates: भारत- झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Zimbabwe vs India 2nd ODI LIVE UPdates: भारत आणि झिम्बाव्वे (ZIM vs IND) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना हेरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे रंगणार आहे.
LIVE
![ZIM vs IND, 2nd ODI LIVE Updates: भारत- झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर ZIM vs IND, 2nd ODI LIVE Updates: भारत- झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/784d895e6009e2e4362b553a3d79c4791660975610339266_original.png)
Background
Zimbabwe vs India 2nd ODI LIVE UPdates: भारत आणि झिम्बाव्वे (ZIM vs IND) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना हेरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं 10 विकेट्सनं जिंकला होता. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज दीपक चहरनं (Deepak Chahar) महत्वाची भूमिका बजावली होती. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताचा मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. तर, या मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ मैदानात उतरणार आहे. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 64 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 52 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील दोन एकदिवसीय सामने अनिर्णित ठरले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 1983 मध्ये खेळण्यात आला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत आठ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील सात मालिकेत भारतानं विजय मिळवलाय. तर, एक मालिका झिब्बाब्वेनं जिंकली आहे. झिम्बाब्वेने 1996-97 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे आठ विकेट्सनं जिकंला होता. तर, दुसरा सामना रद्द झाला होता.
कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्टला शनिवारी खेळवला जाईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.
संघ-
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
भारत vs झिंबाब्वे: 25.3 Overs / IND - 161/5 Runs
भारत vs झिंबाब्वे: 25.2 Overs / IND - 161/5 Runs
भारत vs झिंबाब्वे: 25.1 Overs / IND - 161/5 Runs
भारत vs झिंबाब्वे: 24.6 Overs / IND - 161/5 Runs
भारत vs झिंबाब्वे: 24.5 Overs / IND - 160/5 Runs
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)