एक्स्प्लोर

Ind vs WI Test Series: भारतविरुद्ध वेस्ट इंडिजचा उद्या कसोटी सामना रंगणार; टीम इंडिया कोणाला संधी देणार?, पाहा संभाव्य Playing XI

India vs West Indies Test Series: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

India vs West Indies Test Series: आशिया चषकानंतर (Asia Cup 2025) आता टीम इंडिया वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारताची ही दुसरी कसोटी मालिका आणि 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतली पहिलीच घरच्या मैदानावरील कसोटी मालिका आहे. 

टीम इंडिया पहिल्या कसोटीत तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकते, ज्यामध्ये कुलदीप यादव फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. केएल राहुल आणि मोहम्मद सिराजसह अनेक प्रमुख खेळाडू कसोटी संघात परतणार आहे. ध्रुव जुरेलचा यष्टीरक्षक म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- Team India Probably Playing XI:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

खेळपट्टी कशी असेल?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला जाईल. खेळपट्टीवर भरपूर गवत आहे, जे सामन्यापूर्वी आणखी कमी केले जाईल. लाल मातीची खेळपट्टी चांगली उसळी देते. या खेळपट्टीवर सुरुवातील वेगवान गोलंदाजांना मदत होईल. त्यानंतर फिरकीपटू वर्चस्व गाजवताना दिसतील. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या 347 आहे आणि दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या 353 आहे. तिसऱ्या आणि चौथ्या डावात धावा करणे थोडे कठीण असू शकते. शनिवारी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खेळपट्टी बदलू शकते.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ- (West Indies Full Squad)

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, जोहान लेने, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स

संबंधित बातमी:

India vs West Indies: टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Embed widget