एक्स्प्लोर

IND vs WI 4th T20 Live: भारतासाठी 'करो या मरो'चा सामना, चौथ्या टी20 चे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs WI 4th T20 Live :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे.

Key Events
ind vs wi 4th t20 live updates india playing against west indies match highlights central broward regional park stadium turf ground lauderhill florida IND vs WI 4th T20 Live: भारतासाठी 'करो या मरो'चा सामना, चौथ्या टी20 चे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
india vs west indies

Background

West Indies vs India, 4th T20I :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी  साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 

फ्लोरिडा येथे आज भारताला आज पराभवाचा सामना करावा लागल्यास मालिका गमावावी लागेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. हार्दिक पांड्या अॅण्ड कंपनी विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाच्या नजरा मालिका विजयाकडे असतील. त्यामुळे आज होणारा सामना रंगतदार होईल.  मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती. 

हेड टू हेड - 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 18 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 

कोण वरचढ ?

भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. आतापर्यंत झालेले तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण आता चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुले चौथा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 - 

यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक. 

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11 - 

ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिमरन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेद मैककॉय. 

23:22 PM (IST)  •  12 Aug 2023

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय

23:18 PM (IST)  •  12 Aug 2023

गिल-यशस्वीची जोडीने धुतले - 

शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. गिल आणि यशस्वी या जोडीने विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. या युवा जोडीपुढे विंडिजचे गोलंदाज कमकुवत जाणवत होते. गिल-यशस्वी या जोडीने विक्रमी दीडशतकी भागिदारी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अखेरच्या काही षटकात गिल बाद झाला पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता.  गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 94 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने 47 चेंडूत 79 धावांचे योगदान दिले तर शुभमन गिल याने 47 चेंडूत 77 धावा जोडल्या. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

व्हिडीओ

Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
Embed widget