एक्स्प्लोर

मैच

IND vs WI, 3rd T20: रोहित सेना सुसाट! वनडेनंतर टी-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप

IND vs WI,  Innings Highlight: नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं.

IND vs WI, 3rd T20: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या 4 षटकात 86 धावा केल्या. 

भारताचा डाव
भारताकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, 25 धावांवर असताना श्रेयस अय्यरला हेडन वॉल्शनं बाद केलं आणि भागीदारी मोडली. त्यानंतर ईशान किशनंही लगेच आपली विकेट्स गमावली. चौथ्या क्रमांकावर कप्तान रोहित शर्मा फलंदाजीला आला. पण तोही अपयशी ठरला. रोहितला केवळ 7 धावा करता आल्या. भारतानं 93 धावांवर 4 विकेट्स गमावले. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं तुफान फटकेबाजी करीत भारताचा स्कोर 184 वर पोहचवला. सुर्यकुमार यादवनं 31 चेंडूत 65 (1 चौकार, 7 षटकार) आणि व्यंकटेश अय्यरनं 19 चेंडूत नाबाद 35 (4 चौकार, 2 षटकार) धावांची खेळी केली. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन आणि हेडन वॉल्श यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

वेस्ट इंडीजचा डाव
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाची खराब सुरुवात झाली. वेस्ट इंडीजच्या संघानं तिसऱ्या षटकात दोन विकेट्स गमावल्या. दीपक चहरनं दोन्ही सलामीवीर काईल मेयर्स (6 धावा) आणि शाई होपला (8 धावा) तंबूत पाठवलं.  त्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, सातव्या षटकात मोठा फटका मारण्याचा नादात पॉवेलनं त्याची विकेट्स गमावली.  हर्षल पटेलनं त्याला झेलबाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्ड (5 धावा) आणि जेसन होल्डरही (2 धावा) स्वस्तात माघारी परतले.  100 धावांत वेस्ट इंडीजच्या संघाचे 6 गडी बाद झाले. त्यानंतर पूरननं रोमारियो शेफर्डसोबत किल्ला लढवला. पूरननं आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 20 षटकात वेस्ट इंडीजच्या संघाला 9 विकेट्स गमावून 167 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून हर्षल पटेलनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Arvind Kejariwal Case : अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढSanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानातNavneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ, बच्चू कडूंचा विरोधBachchu Kadu on Navneet Rana : नवणीत राणा यांना उमेदवारी, भाजपची लाचारी, बच्चू कडूंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
Embed widget