जम्बो-भज्जीच्या विक्रमाला सुरुंग, अश्विन भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज
अश्विन वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
Jadeja And Ashwin Bowling Pair Complete 500 Test Wicket : पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले. यामध्ये अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या मोठ्या विक्रमाचाही समावेश आहे. आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा या जोडीने 500 विकेट घेण्याचा विक्रम केलाय. अश्विन आणि जडेजा या जोडीने कसोटीमध्ये 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला, असा पराक्रम करणारी भारताची दुसरी जोडी होय. याआधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या जोडीने असा पराक्रम केला होता. त्यांचा विक्रम मोडीत निघाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या डावात आर अश्विनने चौथ्या दिवसअखेर 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचा संघ 365 धावांचा पाठलाग करत आहे. अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि मॅकेन्झी यांच्या विकेट घेत रविंद्र जडेजासोबत 500 विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान अश्विनने 274 आणि रवींद्र जडेजाने 266 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने एकत्र खेळताना 501 कसोटी बळी घेतले. यामध्ये अनिल कुंबळेने 281 आणि हरभजन सिंगने 220 विकेट घेतल्या. कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने 54व्या कसोटीत 501 बळींचा आकडा गाठला, तर अश्विन आणि जडेजा या जोडीने 49व्या कसोटी सामन्यातच 500 बळींचा आकडा पार करत नवा विक्रम केला.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय जोड्या -
अनिल कुंबळे (281) आणि हरभजन सिंह (220)- 501 विकेट 54 कसोटी
आर अश्विन (274) आणि रविंद्र जडेजा (226)- 500 विकेट 49 कसोटी
बिशन बेदी (184) आणि बीएस चंद्रशेखर (184)- 368 विकेट 42 कसोटी
Most wickets by Indian bowlers in International cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2023
1) Anil Kumble - 956
2) Ravichandran Ashwin - 712*
3) Harbhajan Singh - 711 pic.twitter.com/cHD0qTTBT8
अश्विन भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज -
चौथ्या दिवशी अश्विन याने वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना बाद करत भज्जीचा विक्रम मोडीत काढला. अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याने हरभनज सिंग याला मागे टाकलेय. हरभनजच्या नावावर 711 आंतराष्ट्रीय विकेट्सची नोंद आहे. अश्विनच्या नावावर आता 712 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद झाली.
त्यासोबतच अश्विन वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विन याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. या यादीमध्ये कपिल देव पहिल्या स्थानावर आहेत. कपिल देव यांनी 89 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर 75* विकेट्स आहेत. अनिल कुंबळेच्या नावावर 74 विकेट्स आहेत.
History by Ashwin - Jadeja.
— Johns. (@CricCrazyJohns) July 23, 2023
The duo completed 500 wickets as a pair in Test cricket.
The Greatest spin duo ever. pic.twitter.com/yHsEkWxvMU