एक्स्प्लोर

IND Vs SL: कोण आहे प्रियांक पांचाल? ज्याला राहुलच्या जागी कसोटी संघात मिळाले स्थान

IND Vs SL: श्रीलंकाविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय.

IND Vs SL: श्रीलंकाविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली. तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलंय. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाचं दुखापतीनंतर संघात पुनरागमन झालंय. भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयनं भविष्याचा विचार करीत नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. यामध्ये प्रियांक पांचाल याचाही समावेश आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात प्रियांक पांचालची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. परंतु, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. बीसीसीआयनं पुन्हा एकदा प्रियांक पांचालवर विश्वास दाखवलाय.

प्रियांक पांचाल कोण आहे?
प्रियांक पांचाळने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर हळूहळू आपला ठसा उमटवला. रणजी ट्रॉफीच्या 2016-17 हंगामात तो प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्यानं स्पर्धेत 1310 धावा करून गुजरातला प्रथमच प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकण्यात मदत केली.तो त्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला होता. याचदरम्यान, त्यानं पंजाबविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम 314 धावांची खेळी केली होती.

रणजी ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केल्यानंतर त्याच वर्षी प्रियांकची भारत अ संघात निवड झाली. पुढच्या सत्रात तो पुन्हा एकदा गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये त्याची (2019-20) इंडिया रेड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' कसोटी मालिकेत संघाचा कर्णधार होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर अखेर रोहितच्या जागी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर, पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील. जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. 

श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, जयंत यादव,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget