IND vs SL : भारताला प्रयोग करणं भोवलं, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फलंदाजांना रोखलं, गिलसह पराग अन् सुंदरनं डाव सावरला
Team India : भारतानं श्रीलंकेविरुद्ध 9 विकेटवर 137 धावा केल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये प्रयोग करणं भारताच्या अंगलट आलं आहे.
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 मालिकेतील तिसरी लढत पल्लेकेले येथे सुरु आहे. श्रीलंकेनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन मॅचमध्ये भारतानं जोरदार फलंदाजी केली होती. आज श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना रोखलं. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव,(Suryakumar Yadav) शिवम दुबे आज मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. भारतानं पॉवरप्लेमध्ये 4 विकेटवर 30 धावा केल्या होत्या. यानंतर भारताला पाचवा धक्का शिवम दुबेच्या रुपात बसला. भारताची अवस्था 5 बाद 48 अशी झाली होती. त्यानंतर रियान पराग आणि शुभमन गिलनं भारताचा डाव सावरला. मात्र, 16 व्या ओव्हरमध्ये दोघेही बाद झाले. अखेरीस वॉशिंग्टन सुंदर यानं भारताला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 137 या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याच काम केलं. वॉशिंग्टन सुंदरनं 25 धावांची महत्त्वाची खेळी केली.
शुभमन गिल यानं 39 धावा केल्या तर रियान परागनं 26 धावा करुन बाद झाला. दोघांनी 54 धावांची भागिदारी केली. वनिंदू हसरंगा यानं शुभमन गिल आणि रियान परागला 16 व्या ओव्हरमध्ये बाद केलं. यशस्वी जयस्वालनं 10 आणि शिवम दुबेनं 13 धावा केल्या. संजू सॅमसन आज खातं देखील खातं उघडू शकला नाही. तर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग यांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
भारताला प्रयोग करणं महागात पडलं?
भारतानं आजच्या सामन्यात अनेक प्रयोग केले. प्रथम हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली. यानंतर फलंदाजीच्या क्रमात देखील बदल करण्यात आले. तिसऱ्या स्थानावर संजू सॅमसनला फलंदाजीला पाठवलं, तो अपयशी ठरला. यानंतर रिंकू सिंगला फलंदाजीला पाठवलं तो देखील 1 रन करुन बाद झाला.यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला तो देखील 8 धावा करुन बाद झाला. यानंतर शिवम दुबेला देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं, त्यानं 13 धावा केल्या.
श्रीलंकेकडून महीश तीक्षाणा, वनिंदू हसरंगा,चामिंडू विक्रमसिंघे,असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिसनं प्रभावी गोलंदाजी केली.
भारताचा संघ
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद
श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंडू मेंडिस, चरिथ असालंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तिक्षाना, मथिशा पथिराना आणि असिथा फर्नांडो
संबंधित बातम्या :