IND vs SL 2nd T20I Live Streaming : भारताची झुंज व्यर्थ, 16 धावांनी श्रीलंका विजयी
IND vs SL : पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानात सामना रंगणार आहे.
LIVE
Background
India vs Sri Lanka 2nd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ (India vs Sri Lanka) यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत ही आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. तर दुसरीकडे श्रीलंका संघाला मालिकेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी आजचा विजय अनिवार्य आहे. तर आजचा हा दुसरा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA Stadium) क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजवरच्या इतिहासाचा विचार केला तर दोन्ही संघ आतापर्यंत 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यातील 18 सामने भारतानं जिंकल्यामुळे भारताच पारडं कमालीचं जड दिसून येत आहे. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. याशिवाय दोन्ही संघामधील एक सामना अनिर्णित देखील सुटला आहे. ज्यानंतर आज दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध 28 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावात 128 धावा झाल्या आहेत. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आहे. तसे, पुण्यात आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले गेले आहेत. 2020 मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 6 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या.
भारताचा टी20 संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
श्रीलंका टी20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा