श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विजय, मालिकाही जिंकली; सूर्यकुमार यादव, गौतम गंभीरचा जल्लोष
Ind vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला.
Ind vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 161 धावा केल्या होत्या. टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरताच पावसाला सुरुवात झाली. यानंतर डकवर्थ लुईस नियमानूसार 8 षटकांत 78 धावा करण्याचे लक्ष्य भारताला देण्यात आले होते. या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली.
सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मात्र यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी केली. यानंतर मथिशा पाथिरानाने सूर्यकुमारला झेलबाद केले. सूर्यकुमारने 12 चेंडूत 26 धावा केल्या. संघाच्या 65 धावा असताना टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 15 चेंडूत 30 धावा करत बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 22 धावा केल्या. भारताने या विजयासह टी-20 मालिका देखील जिंकली आहे.
श्रीलंकेकडून कुशल परेराच्या सर्वाधिक धावा-
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल परेराने सर्वाधिक 53 धावा केल्या. पाथुम निसांकाने 32, कुशल मेंडिसने 10, कामिंदू मेंडिसने 26, तर चारिथ असालंकाने 14 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
शेवटच्या 5 षटकांत भारताचे दमदार पुनरागमन-
एकवेळ श्रीलंकेच्या संघाने 15 षटकांत 2 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. कुसल परेरा आणि कामिंदू मेंडिस ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहता श्रीलंकेला 180-190 धावांपर्यंत मजल मारता येईल, असे वाट होते. मात्र 16व्या षटकात हार्दिक पांड्याने प्रथम मेंडिस आणि नंतर परेराला पॅव्हेलियनमध्ये पाठवून यजमान संघाला दुहेरी धक्का दिला. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सलग दोन चेंडूत दासुन शानाका आणि वानिंदू हसरंगाला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अवघ्या 31 धावा देऊन श्रीलंकेला 161 धावांपर्यंत रोखले. रवी बिश्नोईने 3 तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
पहिल्या टी-20 सामन्यातही भारताचा विजय-
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या टी-20 सामन्यात दमदार सुरुवात केली होती. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले होते. हार्दिक पांड्या आणि रियान परागसारख्या फलंदाजांनी निराशा केली असली तरी टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्यानंतर गोलंदाजी कमाल दाखवत भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता.