IND vs SL, 1st T20 Live Blog: भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 1st T20, Ekana Sports City: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी20 सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

abp majha web team Last Updated: 24 Feb 2022 05:36 PM
भारत 62 धावांनी विजयी

श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 137 धावांच करु शकल्याने भारत 62 धावांनी विजयी झाला आहे.

श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परत

श्रीलंकेचा कर्णधार शनाका 3 धावा करुन तंबूत परतला आहे. श्रीलंकेचे 5 गडी बाद झाले आहेत. 48 चेंडूत त्यांना 137 धावांची गरज आहे.

10 षटकानंतर श्रीलंकेचे चार गडी तंबूत

10 षटकानंतर अवघ्या 57 धावांमध्ये श्रीलंकेचे 4 गडी बाद झाले असून 60 चेंडूत त्यांना 143 धावांची गरज आहे.

भुवनेश्वरने टीपला आणखी एक बळी

भुवनेश्वरने श्रीलंकेच्या कामिल मिशाराला बाद करत दुसरी विकेट मिळवली आहे.


भारताची उत्तम सुरुवात, पहिला गडी बाद

भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका याला शून्यावर बाद केलं आहे.

IND vs SL : भारताची धमाकेदार फलंदाजी, श्रीलंकेसमोर 200 धावाचं आव्हान

रोहित आणि ईशानने दमदार सुरुवात केल्यानंतर अखेर श्रेयसनेही अर्धशतक झळकावत 199 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे श्रीलंकेसमोर आता 200 धावांचे आव्हान आहे.

भारताला दुसरा धक्का, ईशान किशन बाद

रोहित शर्मानंतर ईशान किशनही बाद झाला. ईशान किशन याने विस्फोटक फलंदाजी करताना 56 चेंडूत 89 धावा चोपल्या.  

IND vs SL : ईशान किशनचं वादळ, अर्धशतक पूर्ण

भारताकडून ईशान आणि रोहितने धमाकेदार फलंदाजी सुरु केली आहे. ईशाननं 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी श्रीलंका संघ

दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, कामिल मिशारा, जेफरी वॅनडर्से, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा

पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम गोंलंदाजी करण्याचा निर्णय

भारतविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेच्या संघान टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 


 

IND vs SL : लखनौच्या मैदानात पहिला टी20 सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा हा पहिला टी20 सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पार्श्वभूमी

IND vs SL, 1st T20 Live: भारतीय संघा श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी सज्ज झाला असून दोन्ही संघामध्ये आज पहिला टी20 सामना पार पडत आहे. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 सामन्यात व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारतीय भूमीतच भारत श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा आजचा पहिला टी20 सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून आज पहिला तर, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाईल.


 भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणाऱ्या या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता असेल. तसंच आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा संघ तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियातून बाहेर पडले आहेत. आता सूर्यकुमार आणि दीपक चहर देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाल्याने कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहावे लागेल. 


पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल 


पहिल्या टी-20 सामन्यासाठी श्रीलंका संघ (Sri Lanka T20I squad) 


दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश दीक्षाना,  




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.