IND vs WI, T20I : दुखापतीनंतर संघात परतलेला खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेतून बाहेर
India vs West Indies T20I : वेस्ट इंडिजविरोधात अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता.
India vs West Indies T20I : दुखापतीमुळे टी-20 ला विश्वचषकाला मुकलेला अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. कोलकाता येथे होणाऱ्या टी 20 मालिकला वॉशिंगटन सुंदर मुकणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिजविरोधात अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉशिंगटन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. वॉशिंगटन सुंदरच्या जागी बीसीसीआयने कुलदीप यादवला संधी दिली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनवर टी-20 मालिका होणार आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशननं (CAB) गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन टी-20 सामन्यांसाठी ईडन गार्डनवर प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केली.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar ruled out of @Paytm #INDvWI T20I series.
— BCCI (@BCCI) February 14, 2022
The #TeamIndia all-rounder suffered a left hamstring muscle strain during fielding in the third ODI against the West Indies played at the Narendra Modi Stadium on Friday.
More Details 🔽
पहिला टी-20 सामना प्रेक्षकांविना -
"बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी प्रायोजक आणि प्रतिनिधींसाठी फक्त हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसना परवानगी दिली आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केलीय. तसेच बोर्डाकडून परवानगी मिळताच प्रेक्षकांना कळवण्यात येईल, असंही बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निवेदनात म्हटलंय.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (India’s T20I squad) -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव
भारतविरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 मालिका वेळापत्रक -
पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)