(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA T20 Series: हेंड्रिक्स आणि डी कॉक मोडणार रोहित-विराटचं रेकार्ड?
IND vs SA T20 Series: टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे.
IND vs SA T20 Series: टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 9 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज रेझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतात. तसेच भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीचाही विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही रोहित शर्माच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहितनं 13 सामन्यांच्या 12 डावात 362 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीनं 10 सामन्यांच्या 9 डावात 254 धावा केल्या आहेत. मात्र, या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीय. अशा स्थितीत रेझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक या दोघांना रोहित-विराटचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारत-आफ्रिका T20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
फलंदाज | धावा |
रोहित शर्मा | 362 |
सुरेश रैना | 339 |
जेपी ड्युमिनी | 295 |
विराट कोहली | 254 |
शिखर धवन | 233 |
एबी डिव्हिलियर्स | 208 |
एमएस धोनी | 204 |
फरहान बेहार्डियन | 146 |
फाफ डु प्लेसिस | 143 |
जॅक कॅलिस | 140 |
क्विंटन डी कॉक | 137 |
रझा हेंड्रिक्स | 137 |
विराटला मागं टाकण्यासाठी 117 धावांची आवश्यकता
क्विंटन डी कॉक आणि रेझा हेंड्रिक्स यांना रोहित शर्माला मागे टाकायचं असेल तर त्यांना 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्यात किमान 25 धावा कराव्या लागतील. दुसरीकडे, पाहुण्या खेळाडूंना विराट कोहलीला पाठी सोडण्यासाठी केवळ 117 धावांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा-