Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवकडे मालिका विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी, सूर्यादादाच्या रेकॉर्डनं आफ्रिकेचं टेन्शन वाढणार
Suryakumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका उद्यापासुन सुरु होत आहे. भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Suryakumar Yadav T20 Record Against South Africa दरबान: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात तिसरी मालिका भारत खेळणार आहे. सूर्यादादाच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत केलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात मालिका विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. या मालिकेत सूर्यकुमार यादव देखील सर्वांचं आकर्षण ठरणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम सूर्यकुमार यादवनं यापूर्वी दमदार कामगिरी आहे.
सूर्यकुमार यादवची टी 20 मॅचेसमधील फलंदाजीची सर्वाधिक चांगली सरासरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहिली आहे. सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यामध्ये त्यानं 57.67 च्या सरासरीनं 346 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक शतक आणि चार अर्धशतकं केली आहेत. म्हणजेच 7 डावांपैकी 5 डावांमध्ये सूर्यानं 50 धावांपेक्षा अधिक धावा सूर्यकुमार यादवनं केली आहे. सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केल्याचं पाहायला मिळतं. मात्र,डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमारनं दोन डावात अनुक्रमे 56 आणि 100 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादवनं 2024 मध्ये भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवनं 2024 मध्ये 14 मॅचमध्ये चार अर्धशतक केली आहेत. सूर्यानं 14 सामन्यांमध्ये 403 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवनं त्याच्या टी 20 क्रिकेट करिअरमध्ये चार शतकं केली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं एक शतक केल्यास तो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंची बरोबरी करेल. रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांची तो बरोबरी करेल. सूर्यकुमार यादवनं भारताचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर 6 मॅचमध्ये 34 च्या सरासरीनं 204 धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांची चार सामन्यांची मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होत आहे. 8 नोव्हेंबर,10 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी या चार लढती होतील. भारतानं दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावलं होतं. भारत त्या विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
इतर बातम्या :