रोहित विक्रमासाठी तयार, आयपीएलनंतर ब्रेक नाही..दक्षिण आफ्रिकाविरोधात उतरणार मैदानात
South Africa Tour of India : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला यंदा आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

South Africa Tour of India : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला यंदा आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात काही सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. पण रोहित शर्मा या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल. या दौऱ्यात रोहित शर्मा विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो..
दक्षिण आफ्रिकाविरोधात भारताने पहिला सामना जिंकल्यास रोहित शर्मा खास रेकॉर्ड आपल्या नावावर करु शकतो. जुलैमध्ये होणाऱ्या वेस्टविंडिज आणि इंग्लंड दौऱ्याआधी भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात टी 20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिला सामना जिंकल्यास रोहित शर्मा मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. लागोपाठ 13 टी सामने जिंकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. लागोपाठ टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम अफगानिस्थान आणि रोमानिया या देशांच्या नावावर आहे. या देशांनी प्रत्येकी 12 लागोपाठ सामने जिंकलेत.
रोहित खेळणार -
बीसीसीआयच्या निवड समितीमधील एका सदस्याने रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकाविरोधात मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. रोहित शर्मा ब्रेक घेणार नाही, दक्षिण आफ्रिकाविरोधात तो मैदानात उतरणार आहे. आयपीएल प्लेऑफच्या सामन्यावेळी निवड समिती आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये बैठक होणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधातील मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी होणार आहे. सर्व खेळाडू एनसीएमध्ये एकत्र येणार आहेत.
टी20 मध्ये भारताचे लागोपाठ 12 विजय
66 धावा - अफगानिस्तान
8 विकेट - स्कॉटलँड
9 विकेट - नामीबिया
5 विकेट - न्यूझीलंड
7 विकेट - न्यूझीलंड
73 धावा - न्यूझीलंड
6 विकेट - वेस्ट विंडिज
8 धावा - वेस्ट विंडिज
17 धावा - वेस्ट विंडिज
62 धावा - श्रीलंका
7 विकेट - श्रीलंका
6 विकेट - श्रीलंका
IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक
| भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक | ||||
| क्रमांक
| दिवस | तारीख | सामना | ठिकाण |
| 1 | गुरुवार | 9 जून | 1st T20I | दिल्ली |
| 2 | रविवार | 12 जून | 2nd T20I | कटक |
| 3 | मंगळवार | 14 जून | 3rd T20I | वायजाग |
| 4 | शुक्रवार | 17 जून | 4th T20I | राजकोट |
| 5 | रविवार | 19 जून | 5th T20I | बेंगलरु |




















