(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA: भारतासाठी आजही 'करो या मरो'चं! मागील आठ टी-20 मालिकेतील कामगिरी कशी?
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (17 जून) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (17 जून) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले. तर, तिसरा सामन्यात भारतानं विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवूनही भारत 1-2 नं पिछाडीवर आहे. हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी 'करो या मरो' चा असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे पाहणार? हे जाणून घेऊयात.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 10 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.
भारताची मागील आठ टी-20 मालिकेतील कामगिरी
फेब्रुवारी 2019 पासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. त्यावेळी आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताचा 2-0 नं पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतानं घरच्या मैदानावर 8 मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी सात मालिकेत विजय मिळवलाय. तर एक मालिका अनिर्णित ठरली. यादरम्यान भारतानं मागील तीन मालिकांमध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केलाय.
भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.
हे देखील वाचा-