पाऊस ठरला व्हिलन, पहिला टी 20 सामना रद्द, नाणेफेकही झाली नाही
South Africa vs India 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला
South Africa vs India 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. डर्बनमधील किंग्समीड येथे होणारा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुपारपासूनच डर्बनमध्ये पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
निराश होऊन प्रेक्षक परतले -
पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द झाला. सततच्या पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पण पावसामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडली. हजारो चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. सामना सुरु व्हावा, त्यासाठी पंचांनी खूपवेळ वाट पाहिली. पण पावसाने उसंत न घेतल्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना न झाल्यामुळे चाहते निराश होऊन परतले.
Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains.#SAvIND pic.twitter.com/R1XW1hqhnf
— BCCI (@BCCI) December 10, 2023
सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात -
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळाणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टी 20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा धुरा संभाळणार आहे. दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे.
वेळापत्रक काय ?
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T-20 सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल. तिसरा T- 20 14 डिसेंबरला होणार आहे. 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 19 डिसेंबरला तर तिसरा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे.
दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.