एक्स्प्लोर

IND vs SA: दिनेश कार्तिकनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा खास विक्रम!

Dinesh karthik breaks MS Dhoni Record: भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात काल चौथा टी-20 सामना खेळण्यात आला.

Dinesh karthik breaks MS Dhoni Record: भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात काल चौथा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं भारतीय संघासाठी 55 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान, अर्धशतकीय कामगिरीसह दिनेश कार्तिकनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढलाय. 

दिनेश कार्तिकनं धोनीचा विक्रम मोडला
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं एकेकाळी 40 धावांवर तीन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार ऋषभ पंतसह चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 41 धावांची आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकसोबत पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दिनेश कार्तिकनं त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. तसेच सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कार्तिकनं 55 धावा करत धोनीचा खास विक्रम मोडीत काढला. धोनीनं टी-20  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 52 धावांची खेळी केली होती. 

तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतक
कार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.

आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी 
दिनेश कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकनं पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केलं. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकनं 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget