एक्स्प्लोर

Ranji Trophy 2022: यशस्वी जैस्वालनं ठोठावलं टीम इंडियाचं दार, सलग तिसऱ्या डावात झळकावलं शतक

Yashasvi Jaiswal: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे.

Yashasvi Jaiswal: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात बंगळुरू मैदानात रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दोन्ही डावात यशस्वी जैस्वालनं शतक ठोकून भारतीय संघाचं दार ठोठावलंय. या कामगिरीसह त्यानं रणजी ट्रॉफीच्या सलग तीन डावात तीन शतक ठोकली आहेत. यापूर्वी उत्तराखंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या क्वाटर फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं शतक केलं होतं.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सचा भाग होता. या हंगामात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं राजस्थानसाठी 10 सामन्यात 258 धावा केल्या. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामातील काही सामन्यात यशस्वी जैस्वालला प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं. परंतु, अखेरच्या काही सामन्यात त्यानं चांगली खेळी करून दाखवली.

अरमान जाफरचंही शतक
मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफरनंही शानदार शतक झळकावलं आहे. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईचं पारडे जड झालंय. या सामन्यात मुबंईच्या संघानं 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली. या सामन्यात जाफरनं 127 धावांची शानदार खेळी केली.

उत्तर प्रदेशचा संघ 180 धावांवर ढेपाळला
या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईच्या संघानं 393 धावा केल्या. मुंबईच्या पहिल्या डावात हार्दिक तमोरे आणि यशस्वी जैस्वालनं शतक ठोकलं. उत्तर प्रदेशकडून करन शर्मान सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रेदशचा संघ पहिल्या डावात 180 धावा करू शकला. उत्तर प्रदेशकडून शिवम मावीनं 48 आणि माधव कौशिकनं 38 धावा केल्या. मुंबईकडून तनुश कोटीयान, मोहीत अवस्थी आणि तुषार देशपांडेनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
Donald Trump : भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi : यूपी विधानपरिषदेत अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद, आझमींची हकालपट्टी करा:योगी आदित्यनाथManikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, कोकाटेंच्या शिक्षेला स्थगितीBhaskar Jadhav Mumbai | सरकारचा महाराजांवरील प्रेमाचा बुरखा आज फाटला, भास्कर जाधवांचा संतापJaykumar Gore Photo Controversy : राऊत - वडेट्टीवारांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर, जयकुमार गोरे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
Donald Trump : भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
Namo Shetkari : पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरी महासन्मानचे 2000 कधी मिळणार?
पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी मिळणार?
सोलापूरकर आणि कोरटकर यांना  का वाचवताय? ते सरकारचे जावई आहे का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
सोलापूरकर आणि कोरटकर यांना  का वाचवताय? ते सरकारचे जावई आहे का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा!
स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा!
DA Hike: होळीपूर्वी केंद्राचे कर्मचारी, पेन्शनधारकांना गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय होणार? 
होळीपूर्वी केंद्राचे कर्मचारी, पेन्शनधारकांना गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय होणार? 
Embed widget