Ind vs SA, 3rd Test, 2nd Day Highlights: भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी, पण भारताला आणखी विकेट्सची गरज
IND vs SA, 3rd Test, Newlands Cricket Ground: भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ सध्या सुरु आहे.
Ind vs SA, 1 Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ सध्या सुरु आहे. भारताने दिवस सुरु झाल्यापासून महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण आफ्रिकेची धावसंख्याही वाढत असल्याने भारताची चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आणखी काही विकेट्स घेतल्यास सामन्यात टिकून राहता येणार आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यापासून बुमराहने मार्करम याची तर उमेश यादवने केशव महाराज आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांची विकेट घेतली आहे. सध्या कीगन पीटरसन अर्धशतक पूर्ण करुन क्रिजवर टिकून आहे. तर टेम्बा बावुमा त्याची साथ देत आहे.
आतापर्यंत सामन्यात
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला. त्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने पहिला गडी बाद करत भारताला पहिलं आणि मोठं यशही मिळवून दिलं आहे. आता दुसऱ्या दिवशी भारताला पटापट आफ्रिकेचे फलंदाज बाद करुन दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या निर्माण करावी लागणार आहे.
हे देखील वाचा-
- Washington Sundar Covid Positive: युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
- Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार? धाा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha