एक्स्प्लोर
IND vs SA, 2nd T20I, Toss Update : नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जात असून भारताने अंतिम 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
IND vs SA, 2nd T20 Toss Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना पार पडत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भारताने संघात कोणताही बदल केला असून दक्षिण आफ्रिका एका बदलासह मैदानात उतरत आहे.
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतीलस पहिला सामना भारताने 8 विकेट्सच्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही 1-1 अशी बरोबरी घेतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताने पहिल्या उत्तम खेळ दाखवत 8 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी अर्शदीप आणि दीपकने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो केलं. त्यानंतर फलंदाजीत राहुल आणि सूर्याने दमदार फलंदाजी करत सहज विजय मिळवून दिला. त्यामुळेच भारताने दुसऱ्या सामन्यावेळी संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने केवळ एक बदल केला असून तबरेद शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी संघात आला आहे.
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर
दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक,रिले रोस्सू, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, ट्रिस्टन स्टब्स आणि कागिसो रबाडा
South Africa have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I.
— BCCI (@BCCI) October 2, 2022
A look at #TeamIndia's Playing XI here 👇👇
Live - https://t.co/R73i6RryDA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gnw3eUMWPD
हे देखील वाचा -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
बीड
पुणे
Advertisement