IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, सूर्याच्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात गुडघे टेकले, भारताचा 51 धावांनी पराभव!
India vs South Africa 2nd T20I Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना आज मुल्लापुर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
LIVE

Background
India vs South Africa 2nd T20I Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याच्या वनडे मालिकेचा दुसरा सामना आज मुल्लापुर, नवी चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी 6.30 वाजता होईल. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 101 धावांनी पराभूत केले. त्यामुळे मालिकेत आघाडी घेतलेल्या भारताचा हा विजयरथ दुसऱ्या सामन्यातही राखण्याचा प्रयत्न असेल, तर पहिल्या पराभवातून सावरत आफ्रिकेची टीम जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
कटकच्या सामन्यात भारताचे काही प्रमुख फलंदाज शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकले नव्हते. त्यामुळे या तिघांकडून या सामन्यात अधिक जबाबदारीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, सूर्याच्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात गुडघे टेकले, भारताचा 51 धावांनी पराभव!
क्विंटन डी कॉकच्या शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर ओटेनलीट बार्टमनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव केला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डी कॉकच्या शानदार अर्धशतकाच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 213 धावा केल्या.
प्रत्युत्तर, भारत 19.1 षटकांत 162 धावांवर ऑलआउट झाला.
अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
IND vs SA 2nd T20 Live Score : टीम इंडियात संकटात, 3 षटकात 3 मोठे धक्का! गौतम गंभीरचा चेहरा पडला, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कहर
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
शुभमन गिल आपले खाते उघडू शकला नाही आणि लुंगी एनगिडीने त्याला बाद केले.
मार्को जानसेनने सहकारी सलामीवीर अभिषेक शर्मा (17 धावा) ला बाद केले.
त्यानंतर जानसेनने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (5 धावा) ला बाद केले.
सूर्याच्या बाद होताना भारताची धावसंख्या 32/3 होती.




















