IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान यांच्यातील 'महासंग्राम' कधी आणि कुठे पहायला मिळणार?
IND vs PAK T20 Match Live Streaming: T20 विश्वचषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
T20 WC 2021 IND vs PAK: टीम इंडिया रविवारी 24 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करून T20 विश्वचषक (T20 WC 2021) मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या हाय-व्होल्टेज मॅचवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे भारत वर्ल्डकपमध्ये (वनडे आणि टी -20) पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रविवारी टीम इंडिया हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आम्ही या सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देत आहोत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आणि कुठे होणार?
आयसीसी टी -20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे.
लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकतो?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहू शकाल. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हे इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.
सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघायचे?
तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar) वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ वर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स मिळतील.
सराव सामन्यांमध्ये भारताची कामगिरी उत्तम
T20 विश्वचषकापूर्वी भारताने त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा 9 गडी राखून पराभव केला.
सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानची कशी कामगिरी होती?
पाकिस्तानने दोन सराव सामने खेळले, एक जिंकला असून एकात पराभूत झाले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला.