(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK, CWG 2022: हायवोल्टेज सामन्यात पाकिस्तानला टक्कर देण्यासाठी भारत सज्ज; पाहा कशी असेल प्लेईंग इलेव्हन?
India vs Pakistan, CWG 2022: बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
India vs Pakistan, CWG 2022: बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहेत. भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याची प्रेक्षक मोठी उस्तुकता लागलीय. या सामन्यासाठी भारतीय संघ कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. महत्त्वाचं म्हणजे, हा सामना जिंकणाऱ्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील. तर, पराभूत होणाऱ्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
पहिल्या सामन्यात भारताचा तीन विकेट्सनं पराभव
कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाचं महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय. दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आपल्या मोहिमेला सुरुवात केली. हरमनप्रीतनं 34 चेंडूत 52 धावा केल्या आणि शेफाली वर्मानं 33 चेंडूत 48 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघानं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 49 धावांत पाच विकेट्स गमावल्या. भारताला जिंकण्याची मोठी संधी होती. पण गार्डनर, अॅलेसा किंग आणि ग्रेस हॅरिस यांच्या फलंदाजीनं भारताच्या पदरात निराशा पडली. या सामन्यात भारताला तीन विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
अनुभवी अष्टपैलू स्नेह राणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता
अनुभवी अष्टपैलू स्नेह राणाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये बळकट करण्यासाठी तिचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरला बर्मिंगहॅम येथे पोहचता आलं नाही. पाकिस्तानी महिला संघालाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यामुळं आजच्या सामन्यात भारताला पराभूत करून स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.
पाकिस्तानविरुद्ध भारताचा संभाव्य संघ-
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह, रेणुका सिंह.
हे देखील वाचा-
- CWG Medal Tally 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताची टॉप-10 मध्ये एन्ट्री, अव्वल कोण?
- CWG 2022: भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; निखत जरीनही दाखवणार दम, पाहा भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण शेड्यूल
- Bindyarani Devi: वेटलिफ्टिंगमध्ये बिंद्याराणी देवीची धडाकेबाज कामगिरी, देशासाठी रौप्यपदक जिंकलं, भारताच्या खात्यात चौथं पदक