एक्स्प्लोर

IND vs PAK:चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत नवा पेच समोर, हायब्रीड मॉडेलला पीसीबीचा रेड सिग्नल, बीसीसीआयनं आयसीसीला काय सांगितलं? 

Champions Trophy 2025: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्राफी खेळण्यासाठी पुढील वर्षी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. 

Champions Trophy 2025 IND vs PAK नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची जबाबदारी आहे. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार बीसीसीआयनं आयसीसीला निर्णय कळवला असल्याची माहिती आहे. याबाबत बीसीसीआयकडून लेखी देण्यात आलेलं नाही.  भारतानं नकार दिल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीनं आयोजित करावी लागेल, मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे. 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत होणार आहे. इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार बीसीसीआयनं आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भातील निर्णय तोंडी कळवला आहे. याबाबत लेखी देण्यात आलेला नाही. बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत पाकिस्तानला  जाण्यास नकार दिला आहे. टीम इंडिया पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी न गेल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.  

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकाची घोषणा कधी होणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय त्याबाबत घोषणा करु शकते. बीसीसीआयनं अद्याप त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. भारतानं गेल्या जवळपास 17 वर्षांपासून कोणतीही द्वीपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारतीय क्रिकेट संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही हे स्पष्ट झालंय.  

हायब्रीड मॉडेलला पीसीबीचा नकार

क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार पीसीबीनं टीम इंडिया आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबीचे चेअरमन मोहसीन नकवी यांनी ते हायब्रीड मॉडेलसाठी तयार नसल्याचं म्हटलं. हायब्रीड मॉडेल कोणत्याही प्रकारे मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. 2023 मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात आला होता. मात्र, आता टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. त्यामुळं नवा पेच निर्माण झाला आहे.  

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाच गटात आहेत. भारताचा आणि पाकिस्तानचा सामना 1 मार्च रोजी आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ एकाच गटात आहेत. ऐनवेळी भारत स्पर्धेत सहभागी न झाल्यास श्रीलंकेला या  संधी मिळू शकते. 

इतर बातम्या : 

IPL 2025 : केकेआरनं रिलीज करुनही मिशेल स्टार्कचा बोलबाला कायम, तीन संघांमध्ये मोठी चढाओढ, पैशांचा पाऊस पडणार, कोण बाजी मारणार?

Prithvi Shaw : डूबते को तिनके का सहारा.... खराब फिटनेसमुळे बाहेर गेलेल्या पृथ्वी शॉची अचानक संघात निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Embed widget