एक्स्प्लोर

Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलनंतर दुबईत राडा; नरेंद्र मोदी म्हणाले, निकाल तोच...

Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Final) यांच्यात काल (28 सप्टेंबर) अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताच्या या विजयानंतर देशभरात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील एक्सवर ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. 

मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय..., असं नरेंद्र मोदी (Narendra Modi On Asia Cup Final) पोस्ट करत म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे, असं अमित शाह म्हणाले.

भारत-पाकिस्तानचा सामना कसा रंगला? (India vs Pakistan Asia Cup Final)

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांचा पहिला गडी 84 धावांवर गेला, साहिबजादा फरहान 57 (38) धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन 46(35) तर सैम अयूब 14(11) धावा करून बाद झाले. उरलेल्या फलंदाजांत तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रऊफ 6 धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.

भारताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय- (Team India Over Pakistan)

147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.

पाकिस्तानच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार- (Team India Denied Collect Asia Cup Trophy)

भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. एसीसीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला. आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले. भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नकवी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता. 

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
New Zealand Squad For India Tour : रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
Embed widget