IND vs NZ, 3rd T20 Live : भारता न्यूझीलंडवर मोठा विजय, 168 धावांनी सामना जिंकत मालिकाही 2-1 जिंकली
IND vs NZ, 3rd T20 Live Updates : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातल्यावर टी20 मालिका जिंकण्याची संधी आज भारताकडे आहे, पण सामना भारताने गमावल्यास मालिकाही गमवावी लागू शकते.
LIVE
Background
IND vs NZ, 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ (Team India)आज न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिकेतील (IND vs NZ T20 Series) तिसरा आणि निर्णायक आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत आज जो कोणी संघ जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून आले आहेत. 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 10 वेळा 150+ धावा केल्या आहेत. यामध्ये, 5 वेळा संघांनी 180+ चा स्कोअर ओलांडला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे. फलंदाजांसाठी फायद्याच्या या विकेटवर आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसंट येथे झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी पद्धतीने जिंकले. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर.
भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Head to Head) या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. तर न्यूझीलंड संघाचा विचार करता त्यांनी 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत देखील सुटला आहे.
हे देखील वाचा-
न्युझीलँड vs भारत: 12.1 Overs / NZ - 66/10 Runs
झेलबाद!! उमराण मलिकच्या चेंडूवर डेरिल मिशेल झेलबाद झाला. 35 धावा काढून परतला तंबूत
न्युझीलँड vs भारत: 11.6 Overs / NZ - 66/9 Runs
निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, न्युझीलँड ची एकूण धावसंख्या 66 झाली.
न्युझीलँड vs भारत: 11.5 Overs / NZ - 66/9 Runs
हार्दिक पांड्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर ब्लेअर मार्शल टिकरर बाद
न्युझीलँड vs भारत: 11.4 Overs / NZ - 66/8 Runs
निर्धाव चेंडू | हार्दिक पांड्या चा आणखी एक निर्धाव चेंडू
न्युझीलँड vs भारत: 11.3 Overs / NZ - 66/8 Runs
निर्धाव चेंडू. हार्दिक पांड्याच्या तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.