IND vs NZ 1st Test : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला; भारत 5 बाद 122 धावा
भारतीय संघाने आपला पहिला विकेट अवघ्या 16 धावांवर गमावला. त्यानंतर क्रिजवर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताची धुरा थोडीशी सावरणार अशी आशा होती. तेवढ्यात अवघ्या 11 धावांवर जेमिसनचा शिकार झाला.
वेलिंग्टन : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने 55 षटकांत 5 बाद 122 अशी खेळी केली आहे. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर खेळवण्यात आला होता. यावेळी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांना यावेळी अपेक्षित कामगिरी करण्यात आली नाही. भारतीय संघाने 5 विकेट्स गमावत 122 धावा केल्या. परंतु, सामना सुरू असतानाच पाऊस पडू लागला आणि खेळ थांबवावा लागला.
STUMPS! There will be no further play on Day 1 due to rains #NZvIND pic.twitter.com/wFkbJeSNyA
— BCCI (@BCCI) February 21, 2020
भारतीय संघाने आपला पहिला विकेट अवघ्या 16 धावांवर गमावला. त्यानंतर क्रिजवर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताची धुरा थोडीशी सावरणार अशी आशा होती. तेवढ्यात अवघ्या 11 धावांवर जेमिसनचा शिकार झाला. संघाचे दोन फलंदाज 35 धावांवर परतले होते. त्यानंतर अग्रवालला साथ देण्यासाठी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. परंतु तो देखील दबाव झेलू शकला नाही आणि फक्त 2 धावांवर माघारी परतला. भारतीय फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणेने 122 चेंडूंमध्ये चार चौकार ठोकत सर्वाधिक नाबाद ३८ धावांची खेळी साकारली. तर, सलामीवीर मयांक अगरवालच्या नावावर 34 धावा आहेत.
India lose two wickets in the second session on Day 1 of the 1st Test. Rahane (38*) and Pant (10*) keep the scoreboard ticking at Tea. Scorecard - https://t.co/tW3NpQIHJT #NZvIND pic.twitter.com/MqsjeBJ6Dq
— BCCI (@BCCI) February 21, 2020
दुसऱ्या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही. पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या सत्रातही भारताला दोन फलंदाज गमवावे लागले. पण मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मात्र भारताच डाव सावरला.
दोन्ही संघ :
भारत : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड : टॉम लाथम, टॉम ब्लेंडल, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेनरी निकोल्स, बीजे वाटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जँमिसन, टिम साउदी, एजाज पटेल आणि ट्रेंट बोल्ट.
संबंधित बातम्या :
Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर
Laureus world sports awards : सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातील सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान