IND vs NZ, 1st ODI : टॉम लेथमची तुफान फटकेबाजी, जोडीला केनची दमदार बॅटिंग, न्यूझीलंडचा 7 गडी राखून दमदार विजय
IND vs NZ ODI : भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना ऑकलंडमध्ये पार पडला, ज्यामध्ये न्यूझीलंडने 7 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs NZ, 1st ODI Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला.
That's that from the 1st ODI.
— BCCI (@BCCI) November 25, 2022
New Zealand win by 7 wickets, lead the series 1-0.
Scorecard - https://t.co/JLodolycUc #NZvIND pic.twitter.com/HEtWL04inV
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत फलंदाजीला मैदानात आला आणि सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनही 72 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होऊ लागले.पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. संजूने श्रेयससोबत डाव सावरला पण 36 धावा करुन संजूही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही 37 धावांची तडाखेबाज खेळी केली 3 सिक्स आणि 3 फोर त्याच्या बॅटमधून आले. पण या सर्वांमध्ये श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेण्यात मोलाची कामगिरी निभावली. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली.
टॉम-केन जोडीची तुफान फटकेबाजी
न्यूझीलंडचा संघ 307 धावा करण्यासाठी मैदानात उतरला. भारताला पहिलं यश लगेचच मिळालं 22 धावा करुन फिन अॅलन बाद झाला. शार्दूलनं त्याला बाद केलं. त्यानंतर कॉन्वेही 24 धावा करुन उमरान मलिकच्या चेंडूवर बाद झाला. मग केननं संघाचा डाव सावरला तेव्हात उमराननं आणखी एक विकेट घेत डॅरील मिचेलला 11 धावांवर तंबूत धाडलं. पण त्यानंतर टॉम लेथम फलंदाजीला आला आणि त्याने केनसोबत मिळून सामना 47.1 षटकातंच न्यूझीलंडला जिंकवून दिला. टॉमने 104 चेंडूत तब्बल 19 फोर आणि पाच सिक्स मारत नाबाद 145 धावा ठोकल्या. तर केननं 98 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 94 धावा केल्या. या दोघांनी एक अभेद्य भागिदारी करत सामना न्यूझीलंडला 7 गडी राखून जिंकवून दिला. तुफान फटकेबाजी केलेल्या टॉमॉला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-