एक्स्प्लोर

IND Vs IRE, 2nd T20 Live : भारत-आयर्लंड दुसरा सामना आज, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND Vs IRE Live Score : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी20 सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी विजय मिळवला होता.

LIVE

Key Events
IND Vs IRE, 2nd T20 Live : भारत-आयर्लंड दुसरा सामना आज, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IND Vs IRE 2nd T20 Live Updates : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी20 सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी विजय मिळवला होता. आज दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरले. तर दुसरीकडे आयर्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा केला होता. त्याला रवि बिश्नोई याच्या फिरकीची जोड मिळाली होती. आजच्याही सामन्यात यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची आपेक्षा असेल. अर्शदीप सिंह पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता, आज त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी क्रीडा चाहत्यांना आपेक्षा आहे. 

दुसरीकडे आयर्लंडला आपल्या फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडची आघाडीची फळी ढेपाळली होती. अवघ्या 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला होता. आज आघाडीच्या फळीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 

भारतीय फलंदाजांना पहिल्या सामन्यात तितका वाव मिळाला नव्हता. सहा षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. यशस्वी जायस्वाल याने दमदार सुरुवात केली होती. ऋतुराजने त्याला चांगली साथ दिली होती. तिलक वर्मा मात्र गोल्डन डकचा शिकार झाला होता. आज होणाऱ्या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 

कुठे पाहणार लाईव्ह ? 

कधी सुरु होणार सामना ?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल. 

आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.  तिन्ही सामने डबलिन येथेच होणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आज डबलिन येथे दुसरा टी20 सामना होणार आहे.  23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना डबलिन येथेच होणार आहे. 

दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?

भारत : 

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड : 

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.

22:53 PM (IST)  •  20 Aug 2023

भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय

भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय... मालिकाही जिंकली

22:51 PM (IST)  •  20 Aug 2023

आयर्लंडला आठवा धक्का

आयर्लंडला आठवा धक्का...  भारत विजयाच्या जवळ

22:37 PM (IST)  •  20 Aug 2023

आयर्लंडला सातवा धक्का

आयर्लंडला सातवा धक्का बसलाय. मोक्याच्या क्षणी बुमराहने विकेट घेतली.

22:32 PM (IST)  •  20 Aug 2023

आयर्लंडला मोठा धक्का

अर्शदीप सिंह याने मोक्याच्या क्षणी एंड्रयू बालबर्नी याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले. 

22:29 PM (IST)  •  20 Aug 2023

आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत

आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतलाय. मोक्याच्या क्षणी विकेट पडली. आयर्लंड पाच बाद 115 धावा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget