IND vs IRE, 1st T20 Live : दीपक हुडाची तुफानी फलंदाजी; भारताचा 7 विकेट्सने दणदणीत विजय

IND vs IRE : आयर्लंडच्या मैदानात आज भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 सामना खेळत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jun 2022 01:21 AM
IND vs IRE : सात विकेट्सनी भारत विजयी

भारताने तीन गडी गमावत विजय मिळवला आहे. यावेळी दीपक हुडाने नाबाद 47 धावांची तुफानी खेळी केली. 

IND vs IRE : कर्णधार पांड्या बाद

कर्णधार हार्दिक पांड्या 24 धावा करुन बाद जाला आहे. 8 षटकानंतर भारताचा स्कोर 94 वर 2 बाद झाला आहे.

IND vs IRE : पांड्या हुडा जोडीची तुफान फटकेबाजी

पहिले दोन गडी बाद झाल्यानंतर दीपक हुडा आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी तुफान फलंदाजी सुरु केली आहे. 

IND vs IRE : सूर्यकुमार शून्यावर बाद

ईशान नंतर सूर्यकुमारलाही शून्यावर क्रेग यंगने तंबूत धाडलं आहे.

IND vs IRE : ईशान किशन बाद

11 चेंडूत 26 धावा करुन ईशान किशन बाद झाला आहे.

IND vs IRE : भारतासमोर 109 धावाचं आव्हान

हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावा केल्यामुळे आता भारताला विजयासाठी 109 धावा 12 षटकात करायच्या आहेत. 

IND vs IRE : हॅरी टेक्टरचं दमदार अर्धशतक

आयर्लंडचे फलंदाज एका मागे एक तंबूत जात असताना हॅरी टेक्टरने 29 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

IND vs IRE : चहलने घेतली चौथी विकेट

युजवेंद्र चहलने लोर्कन टकरला तंबूत धाडलं आहे.

IND vs IRE : आयर्लंडचे तीन गडी तंबूत

भारताचा कर्णधार हार्दीकने पॉल स्टर्लिंगला बाद केल्यानंतर आवेश खाननेही गॅरेथला बाद केलं आहे. 6 षटकानंतर आयर्लंडचा स्कोर 52/3 आहे.

IND vs IRE : पहिल्याच षटकात भुवनेश्वरने घेतली विकेट

पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वरने आयर्लंडचा सलामीवीर कर्णधार अँन्ड्रूला बाद केलं आहे.

IND vs IRE : भारतीय वेळेनुसार 11.20 ला सुरु होणार सामना

पाऊस थांबला असून भारतीय वेळेनुसार सामना 11 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार आहे. 12 ओव्हर खेळवल्या जाणार आहेत.

IND vs IRE : पाऊस थांबला, पण सामना सुरु होण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

सामना होणाऱ्या मैदानातील पाऊस थांबला असला तरी सामना नेमका कधी सुरु होणार याबद्दल अद्याप माहिती आलेली नाही.


 





IND vs IRE : सामन्याला आणखी उशीर

पाऊस अजूनही सुरुच असल्याने सामना अजूनही सुरु झालेला नाही. पावसाची स्थिती पाहता आज सामना होईल की नाही हे देखील सांगता येणार नाही.

IND vs IRE : पुन्हा पावसाचा व्यत्यय

सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय आला असून यामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत आहे.

IND vs IRE: कशी आहे आयर्लंडची अंतिम 11?

पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट 

IND vs IRE: कशी आहे भारताची अंतिम 11?

ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,आवेश खान, उमरान मलिक.

IND vs IRE: नाणेफेक जिंकत भारताने निवडली गोलंदाजी

नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

IND vs IRE: उमरान मलिक उतरणार मैदानात

भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला भुवनेश्वरने कॅप दिली असून आज पहिल्यांदाच उमरान भारतासाठी मैदानात उतरेल.


 





IND vs IRE : सामन्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. 

IND vs IRE : कशी असेल भारताची अंतिम 11?

अशी असू शकते संभावित प्लेईंग 11 - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

IND vs IRE : थोड्याच वेळात रंगणा भारत विरुद्ध आयर्लंड

आज 26 जून रोजी होणारा भारत आणि आयर्लंड हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजता सुरु होईल. 8 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  

पार्श्वभूमी

IND vs IRE, Live : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णीत सुटल्यानंतर आजपासून भारत आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.  भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यात पहिला टी20 सामना आज आयर्लंडच्या मैदानावर खेळवला जात आहे. आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमवर (Castle Avenue, Dublin) हा सामना खेळवला जात असून आजवर आयर्लंडने एकदाही भारताला मात दिलेली नसली तरी सामना होमग्राऊंडवर असल्याने सामना चुरशीचा होईल हे नक्की.


सामना पार पडणाऱ्या आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण याठिकाणी आजवर अधिक सामने झाले नसले तरी जेही सामने झालेत त्यात 9 एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाना विजय मिळाला आहे. तर 14 सामन्यांत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या संघानी विजय मिळवला आहे.  भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.


कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11?


भारत - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.


आयर्लंड - अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टलिंर्ग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.



हे देखील वाचा- 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.