Asim Sarode on Prashant Koratkar : इंद्रजित सावंत धमकी प्रशांत कोरटकर आवाज माॅर्फ करण्यात आला असे म्हणत आहे, तर त्याने व्हाईस सॅम्पल का दिले नाही? आवाज त्याचाच हे मी व्यक्तीगत ओळखतो. या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे एकूण 67 कोटींच्या कार आहेत, इतकी प्रगती कशी झाली? मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती वकील असीम सरोदे यांनी केली. सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा विषारी डोक्याचा असून शातीर, बदमाश वक्तीप्रमाणे वागला आहे. कोल्हापूर न्यायालयाने तो क्रिमिनल माईंडचा नसल्याचे सांगितले, पण तो क्रिमिनल असल्याचे सरोदे यांनी सांगितले.
असीम सरोदे काय म्हणाले?
प्रशांत कोरटकर नावाचा जो तथाकथित कधी पत्रकार आहे त्याने बऱ्याचशा गोष्टी नेहमीच केल्या आहेत. त्यामुळे तो ज्या विचारधारेशी संबंधित आहे त्या विचारधारांशी अनुसरून त्यांनी जे वक्तव्य इंद्रजित सावंत यांच्याशी कॉल करून केलं आणि ते कॉल रेकॉर्ड होऊन ते सगळीकडे व्हायरल झाले. प्रशांत कोरटकरची त्यामधील भाषा आणि शब्द क्रूर स्वरूपाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे. तुम्ही जर ते दोन-तीन पाने बघितली, तर ते सगळे कम्युनिकेशन अत्यंत भयानक स्वरूपाचे आहे. अशा आरोपीला एका अर्ध्या तासात तात्पुरते अटकेपासून संरक्षणासाठी जामीन मिळतो ही अत्यंत धक्कादायक गोष्ट ठरत होती त्याच्या आधारे सरकारने सुद्धा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दिला.
पण कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही
अटकेपासून तात्पुरता जामीन दिला आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्याबद्दलची सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर झाली. त्यांनी सांगितलं की आज दुपारी कोल्हापूरला या संदर्भातील सुनावणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाही. आरोपीने ज्या अटींचे पालन केलं नाही त्याचं सुद्धा वाचन न्यायालयाने केलं. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर दोन अटी महत्त्वाच्या घालण्यात आल्या होत्या. कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर होणे, पण कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही. त्याच्यावर दुसरी अट टाकण्यात आली होती की त्याचा मोबाईल त्वरित पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे. परंतु त्यांनी स्वतः न देता आपल्या पत्नीतर्फे तो मोबाईल पाठवला आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉरमॅटिंग करून म्हणजे डेट नष्ट केला होता.
याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा प्रशांत कोरटकरने केला आहे. या सगळ्या गोष्टींची मांडणी आम्ही इंद्रजीत सावंततर्फे कोल्हापूरच्या न्यायालयात आता करणार आहोत आणि त्याला जामीन मिळू नये असा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्याची व्याप्ती आणि परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरे भावनिकदृष्ट्या महाराष्ट्राचे बाॅस आहेत आणि त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारं आहे. यामुळे त्याला जामीन मिळू नये, अशी मागणी आम्ही इंद्रजीत सावंत यांच्यामार्फत करणार आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या