मै नमक हू महाराज! केएल राहुलने टीम इंडियासाठी नेमकं काय केलं, छावा चित्रपटातील डायलॉग होतोय व्हायरल

KL Rahul Conection Chhaava Movie Dialogue: छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विक्की कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपटातील डायलॉग्स मनाचा ठाव घेत आहेत.

KL Rahul Conection Chhaava Movie Dialogue

1/12
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'छावा'ची तुलना सध्या नुकत्याच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात धुमाकूळ घातलेल्या टीम इंडियाच्या धुरंधरांशी केली जात आहे.
2/12
सोशल मीडियावर सध्या टीम इंडियाचे खेळाडू आणि त्यांना समर्पक ठरणारे 'छावा' सिनेमातील डायलॉग्स चर्चेत आहेत.
3/12
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये 'छावा' सिनेमातला एक समर्पक डायलॉग टीम इंडियाचा धुरंधर, केएल राहुलसाठी दिला आहे.
4/12
'छावा' सिनेमात एक सीन आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ एकत्र रात्रीचं जेवण करत आहेत. त्यावेळी छत्रपती संभाजी राजांचे मित्र, विश्वासू कवी कलशही उपस्थित आहेत.
5/12
कवी कलश छत्रपती संभाजी राजांना उद्देशून म्हणतात की, "हम नमक है महाराज, जब जहा जितनी आवश्यकता हो, प्रयोग कर लिजिए...", त्यानंतर छत्रपती शंभू राजे खळखळून हसतात आणि कवि कलशांना उद्देशून म्हणतात की, "हम आपको शत्रू के घाव पे लगाऐंगे, छंदोगामात्य..." त्यानंतर कवी कलश निखळ हसतात आणि राजांना उद्देशून, "सौभाग्य... सौभाग्य... " एवढंच म्हणतात.
6/12
'छावा'मधल्या याच डायलॉगची तुलना सध्या टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज केएल राहुलसोबत केली जात आहे. ज्यानं टीम इंडियाला चॅम्पियन ट्रॉफी मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
7/12
केएल राहुल हा असाच एक भारतीय क्रिकेटपटू आहे... ज्याच्या पदरी कौतूक फार कमी आणि टीकाच अधिक पडली. पण हा एकमेव खेळाडू आहे, जो आणीबाणीच्या, कठीण प्रसंगात टीम इंडियासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे.
8/12
तसं पाहायला गेलं तर, केएल राहुलची भारतीय क्रिकेट संघात कोणतीही निश्चित भूमिका नाही, पण तरीही प्रत्येकवेळी त्यानं त्याच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कोणत्याही गोष्टीसाठी राहुल कधी नाही म्हणाला नाही. तर हसत हसत त्या-त्या भूमिकेत त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं.
9/12
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राहुलला सातत्यानं प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत असताना अनेकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. पण आता याच राहुलनं टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
10/12
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम इंडियाच्या प्रवासात केएल राहुलनं बांग्लादेश विरुद्ध 47 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 34 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. तसेच, फायनलला न्यूझीलंड विरुद्ध 33 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या.
11/12
केएल राहुलच्या याच खंबीर खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतचा रस्ता सोपा झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
12/12
याच केएल राहुलला नेटकऱ्यांनी छावाचा कवी कलशांचा डायलॉग समर्पित केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, केएल राहुलवरही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Sponsored Links by Taboola