(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs IRE, 1st T20, Toss Update : भारताने जिंकली नाणफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय
IND vs IRE : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्याला सुरुवात होण्यासाठी काही वेळच शिल्लक असून नुकतीच नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी निवडली आहे.
IND vs IRE Live : आज भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यात पहिला वहिला टी20 सामना आयर्लंडच्या डबलीन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे काहीसा उशीर नाणेफेकीला झाला. पण नाणेफेक जिंकत नुकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ भारताने घेतला आहे.
आजच्या मैदानाची खेळपट्टी पाहता प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय़ आम्ही घेणार होतो. पण वातावरण पाहता प्रथम गोलंदाजी घेणं अधिक फायद्याचं आहे असं स्पष्टीकरण नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने दिलं आहे. विशेष म्हणजे युवा गोलंदाज उमरान मलिकने आज संघात पदार्पण केलं असून भुवनेश्वर कुमारने त्याला कॅप देत त्याचं स्वागत केलं आहे. अर्शदीप आणि राहुल त्रिपाठी यांना आज संधी मिळालेली नाही. तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहुया...
दोन्ही संघाची अंतिम 11
भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,आवेश खान, उमरान मलिक.
आयर्लंड - पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट
भारत विरुद्ध आयर्लंड Head to Head
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.
हे देखील वाचा-