IND vs ENG Semi Final LIVE : भारत-इंग्लंडची फायनलसाठी लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IND vs ENG Semi Final LIVE Score: गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. भारताला 2022 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल.
LIVE
Background
IND vs ENG T20 World Cup 2024 Semi Final LIVE Score: टी20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि भारतीय संघ फायनलच्या तिकिटासाठी भिडणार आहेत. दक्षिण आफ्रिकासोबत शनिवारी फायनल कोण खेळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. त्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत.
गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. 2022 सालच्या टी20 विश्वचषकातही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. अॅडलेडमधल्या त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत.
भारताची 171 धावांपर्यंत मजल
भारताची 171 धावांपर्यंत मजल, इंग्लंडला विजयासाठी 172 धावांची गरज
भारताला सातवा धक्का
अक्षर पटेलच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला. अक्षर पटेल 10 धावांवर बाद झाला.
रविंद्र जाडेजाचा फिनिशिंग टच
रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांच्याकडून शानदार फटकेबाजी सुरु आहे. जाडेजाने जोफ्रा आर्चरची गोलंदाजी धू धू धुतली.
भारताला मोठा धक्का
हार्दिक पांड्यानंतर शिवम दुबे स्वस्तात तंबूत परतला. शिवम दुबे याला भोपळाही फोडता आला नाही. भारताला सहावा धक्का
हार्दिक पांड्या बाद..
हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या 13 चेंडूत 23 धावांवर बाद झाला.