Ind vs Eng 5th Test Day 1 Stumps : गिल-जैस्वाल अन् राहुल हे तिघेही फ्लॉप, मग करुण नायरने दाखवली जादू; 8 वर्षांनंतर ठोकले अर्धशतक, ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
India vs England 5th Test Day 1 Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.
LIVE

Background
India vs England 5th Test Day 1 Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेत यजमान संघ 2-1 ने पुढे आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा कसोटी सामना जिंकावा लागेल. यासाठी टीमच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. या मालिकेत उत्तम फॉर्ममध्ये असलेले कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांना पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करावी लागेल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या कसोटी सामन्यात खेळत नाहीये. टीम इंडियासाठी हा मोठा दिलासा आहे. ऑली पोप यांच्याकडे इंग्लंड संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
गिल-जैस्वाल अन् राहुल हे तिघेही फ्लॉप, मग करुण नायरने दाखवली जादू; ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेट गमावून 204 धावा केल्या आहेत. खेळ थांबेपर्यंत करुण नायर 52 धावांवर खेळत आहे, तर मँचेस्टर कसोटीचा शतकवीर वॉशिंग्टन सुंदर 19 धावा करून अजूनही क्रीजवर आहे. दोघांमध्ये 51 धावांची भागीदारी झाली आहे. पहिला दिवस पावसामुळे प्रभावित झाला होता, ज्यामुळे पहिले सत्र लवकर संपवावे लागले. ओव्हलच्या मैदानात वारंवार पाऊस पडत असल्याने सामना दुपारच्या जेवणानंतर बराच उशिरा सुरू झाला.
टीम इंडियाला अजून एक धक्का! साई सुदर्शन OUT, एकामागून एक सर्व स्टार फलंदाज फेल
भारताची चौथी विकेट पडली आहे. साई सुदर्शन 108 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. भारताने 102 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत.




















