INDvsENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक चांगली बातमी दिली आहे. चेन्नईमध्ये खेळला जाणारा हा सामना पाहण्याकरता 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तिकिटांच्या विक्रीबाबत लवकरच माहिती देण्यात येणार असल्याचं BCCI ने सांगितलं आहे.


ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेची क्रिकेटरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. इंग्लंड आणि भारत या संघांमधील टक्कर पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेती उत्सुक आहेत. सोमवारी, BCCI ने चेन्नईत होणार्‍या दुसर्‍या सामन्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.


दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांचे आयोजन करण्याची जबाबदारी चेन्नईवर देण्यात आली आहे. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिन आरएस रामास्वामी यांनी दुसर्‍या कसोटीत प्रेक्षकांच्या क्षमतेच्या 50 टक्के स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची माहिती दिली आहे.


कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात

  • पहिला सामना: 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी (चेन्नई)

  • दुसरा सामना: 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी (चेन्नई)

  • तिसरा सामना: 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (अहमदाबाद)

  • चौथा सामना: 4 मार्च ते 8 मार्च (अहमदाबाद)


पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या