IND Vs ENG : इंग्लंड विरोधात 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कुलदीपने आपला शेवटचा सामना भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2018-2019 मध्ये खेळला होता.
बीसीसीआयने शनिवारी एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये अजिंक्य रहाणे म्हणत आहे की, "तुमच्यासाठी हे अत्यंत कठिण होतं. तुम्ही इथे एकही सामना खेळला नाहीत, परंतु, तुमचं वागणं अत्यंत चांगलं होतं. आता आपण भारतात परतत आहोत, तुमचीही वेळ येईल. त्यामुळे मेहनत करत राहा."
याआधी शुक्रवारी भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितलं की, कुलदीप भारतात खेळेल. अरुणचा व्हिडीओदेखील बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघ प्रशासनाने तेथील मैदानांनुसार, खेळाडूंची निवड करण्याची रणनिती आखली होती, त्यामुळे कुलदीप यादवला ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याची परवानगी मिळाली नाही," ते म्हणाले की, "या दौऱ्यावर तो खेळला नाही, तर ठिक आहे, तो मेहनत घेत आहे, तसेच त्याने आपली शानदार खेळी दाखवली आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पीचनुसार खेळाडू निवडण्याची रणनीती आखली होती. लक्षात ठेवा कुलदीप यादवला जेव्हा खेळण्याची संधी मिळेल, त्यावेळी तो दाखवू शकतो की, तो काय करु शकतो. भारतात जेव्हा संघ चार कसोटी सामने खेळेल त्यावेळी त्यांची वेळ असेल. कुलदीप जेव्हाही भारतासाठी खेळला त्याने शानदार खेळी केली आहे. टी20 सामन्यात त्याला संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने उत्तम गोलंदाजी केली होती."
कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात
- पहिला सामना : 5-9 फेब्रुवारी (चेन्नई)
- दुसरा सामना : 13-17 फेब्रुवारी (चेन्नई)
- तिसरा सामना : 24-28 फेब्रुवारी (अहमदाबाद)
- चौथा सामना : 4-8 मार्च (अहमदाबाद)
टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादमध्ये
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी -20 मालिका देखील खेळणार आहे. सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. पहिला सामना 12 मार्च, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना 18 मार्च आणि शेवटचा सामना 20 मार्चला होईल. सध्या टी -20 साठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना : 23 मार्च (पुणे)
- दुसरा सामना : 26 मार्च (पुणे)
- तिसरा सामना : 28 मार्च (पुणे)
महत्त्वाच्या बातम्या :