IND vs ENG : इंग्लंड क्रिकेट टीमने 107 वर्षांनी पहिल्यांदा परदेशी धरतीवर सलग पाच कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी गॉल इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा सहा विकेट्सनी पराभव केला. इंग्लंडने ही मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली. यापूर्वी इंग्लंडने परदेशात सलग पाच किंवा त्याहून अधिक कसोटी सामने 1911 पासून 1914 दरम्यान जिंकले होते.


इंग्लंडने श्रीलंकेच्याच मायभूमीवर त्यांना पराभूत करत 2-0 अशा फरकाने मालिका खिशात घातली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत सलग तीन कसोटी सामने जिंकत मालिका इंग्लंडने आपल्या नावे केली होती. केपटाऊनमध्ये पहिला कसोटी सामना 189 धावांनी, पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना 53 धावांनी, तर जोहान्सबर्गमधील तिसरा कसोटी सामना 191 धावांनी जिंकला होता.


त्यानंतर इंग्लंडने श्रीलंकेला पहिला कसोटी सामन्यात सात विकेट्सनी आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सहा विकेट्सनी मात दिली आहे. इंग्लंडने यापूर्वी 107 वर्षांपूर्वी, परदेशात सलग सात कसोटी सामने जिंकले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत तीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर 1911 आणि जानेवारी 1914 मध्ये चार कसोटी सामने जिंकले होते.


India vs England 2021 Test Schedule: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात, पाहा संपूर्ण टाईमटेबल


टीम इंडिया इंग्लंडची विजयी घौडदौड रोखणार?


श्रीलंकेनंतर आता इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच टीम इग्लंड भारताविरोधात चेन्नईमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. अशातच इंग्लंडची नजर परदेशात आपली सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्यावर असेल, तर टीम इंडिया इंग्लंडची विजयी घौडदौड रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळवण्यात येईल. या मैदानावर इंग्लंडच्या विरोधात भारताने अनेक रेकॉर्ड केले आहेत.


आठ वर्षांपूर्वी भारत मायभूमीतच इंग्लंडकडून पराभूत


टीम इंग्लंड डिसेंबर 2016 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-4 अशी मालिका जिंकत भारताला स्वतःच्याच मायभूमीत पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, 2012-13 मध्येही इंग्लंडने एलिस्टर कुकच्या नेतृत्त्वात भारताला पराभूत केलं आहे. त्यावेळी इंग्लंडने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.


महत्त्वाच्या बातम्या :