Ind vs Eng : टीम इंडियाचे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून काही दिवसांपूर्वीच मायदेशी परतले आहेत. आता पुढच्याच महिन्यात टीम इंडिया इंग्लंड क्रिकेट टीमचा पाहुणचार करणार आहे. टीम इंग्लंडही श्रीलंकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजय मिळवत आत्मविश्वासाने भारतासोबतच्या सामन्यांत खेळण्यासाठी तयार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मात्र सामन्यांपूर्वी प्रॅक्टिस करण्यासाठी केवळ 3 दिवस मिळणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाकडे केवळ तीन दिवस प्रॅक्टिससाठी असणार आहे. सर्व खेळाडूंना 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू 27 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये दाखल होणार आहेत.
इंग्लंडचे तीन खेळाडू भारतात दाखल
सध्या सोमवारी इंग्लंज क्रिकेट टीमचे तीन खेळाडू बेन स्टोक्स, जोप्रा आर्चर आणि रोरी बर्न्स भारतात दाखल झाले आहेत. ज्यांच्याकडे क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर 5 दिवसांचा कालावधी प्रॅक्टिससाठी असणार आहे. दरम्यान, या तीन खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे हे तीन खेळाडू आधीच भारतात दाखल झाले आहेत. तसेच इंग्लंडचे इतर खेळाडू श्रीलंकेहून थेट भारतात दाखल होणार आहे.
दोन स्टेडियममझ्ये होणार 4 कसोटी सामने
दोन्ही संघांबाबत बोलायचं झालं तर पहिला कसोटी सामना 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आणि दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. त्यानंतर तिसरा सामना 24 फेब्रुलारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान आणि 4 ते 8 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :