एक्स्प्लोर

Rishabh Pant Record : पंतने रचला नवा विक्रम; 100 षटकार ठोकणारा सर्वात तरुण भारतीय, मास्टर ब्लास्टरला टाकलं मागे

India vs England : बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पंतने शतक ठोकत भारताचा डाव सांभाळला आहे.

India vs England Test, LIVE : भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दमदार शतक पूर्ण केलं आहे. पण त्याआधी सामन्यात त्याने ठोकलेल्या पहिल्या-वहिल्या शतकासह एक नवा रेकॉर्ड रचला आहे. त्याने 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. पंत सर्वात कमी वयात 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करणारा भारतीय बनला आहे.

पंत 24 वर्षे 271 दिवसांचा असतानाच 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले आहेत. याआधी 25 वर्षाचा असताना सचिनने हा रेकॉर्ड केला होता. पण आता हा रेकॉर्ड पंतच्या नावे झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना असून त्याने 25 वर्षे 77 दिवसांचा असताना 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते. याशिवाय 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करण्यासाठी पंतने 116 सामने खेळत दुसरा क्रमांक गाठला आहे. याआधी हार्दिकने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 षटकार पूर्ण केले आहेत. यादीत तिसऱ्या स्थानावर केएल राहुल असून त्याने 129 सामन्यांत 100 षटकार पूर्ण केले आहेत. 

सर्वात कमी सामन्यांत 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण कऱणारे भारतीय

  • 101 - हार्दिक पांड्या
  • 116 - ऋषभ पंत
  • 129 - केएल राहुल
  • 132 -एम एस धोनी
  • 166 - सुरेश रैना
  • 166 - रोहित शर्मा 

पंत-जाडेजा जोडीने सांभाळला डाव

सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दोन्ही सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच तंबूचा रस्ता धरला. पण त्यानंतर मैदानावर आलेल्या पंत, जाडेजा जोडीने मात्र एका संयमी खेळीने भारताचा डाव सावरला. यावेळी पंतने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी सुरु ठेवली. 89 चेंडूत त्याने 15 चौकार आणि एका षटकरासह 100 धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे जाडेजानेही त्याला चांगली साथ देत अर्धशतक पूर्ण केलं असून जाडेजाने 50 धावा करण्यासाठी 109 चेंडू घेतले.  

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget