Ind vs Eng 5th Test Day 3 : ओव्हल कसोटीचा तिसरा दिवस संपला, शेवटच्या चेंडूवर सिराजने इंग्लंडला दिला मोठा धक्का, भारताने दिले 374 धावांचे लक्ष्य
England vs India 5th Test Day 3 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलची लढत आता अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे.
LIVE

Background
England vs India 5th Test Day 3 Live Score Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलची लढत आता अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे. या चुरशीच्या सामन्याची विशेषता म्हणजे इथून पुढे निकाल होण्याची शक्यता प्रबळ वाटत आहे. कारण अजून तीन पूर्ण दिवसांचा खेळ बाकी आहे. ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताला इंग्लंडसमोर मोठं लक्ष्य उभं करायचं आहे. पण खरा प्रश्न हा आहे ते लक्ष्य किती असावं?
भारताकडे 52 धावांची आघाडी
ओव्हल टेस्टची आतापर्यंतची परिस्थिती पाहता, दोन्ही संघांनी आपापली पहिली डाव पूर्ण केली आहेत, तेही फक्त दोन दिवसांत. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या, त्यावर इंग्लंडने 247 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 75 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता भारताकडे एकूण 52 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी ही आघाडी आणखी मजबूत करण्याच्या निर्धाराने भारतीय फलंदाज मैदानात उतरतील.
तिसऱ्या दिवशी ओव्हलमध्ये हवामान कसे असेल
या सामन्यात हवामानाची भूमिकाही लक्षणीय ठरत आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा व्यत्यय खेळावर स्पष्टपणे जाणवला. मात्र तिसऱ्या दिवसासाठी हवामानाची बातमी समाधानकारक आहे, आकाश निरभ्र राहील आणि संपूर्ण दिवसभर खेळ निर्विघ्नपणे पार पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताला आता तिसऱ्या दिवशी जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडला लक्ष्य द्यायचं आहे. हवामान अनुकूल असेल, त्यामुळे खेळात भरपूर ड्रामा आणि थरार पाहायला मिळणार, हे नक्की.
दुसऱ्या डावात टीम इंडियाचं 396 वर पॅकअप, इंग्लंडला मिळाले इतक्या धावांचे लक्ष्य, जाणून घ्या अपडेट
यशस्वी जैस्वालचे शतक (118 धावा) आणि आकाशदीप (66 धावा), रवींद्र जडेजा (53 धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (53 धावा) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे भारतीय संघाने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 23 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने 396 धावा केल्या.
दुसऱ्या सत्राचा खेळ संपला
भारताची धावसंख्या सहा विकेटच्या मोबदल्यात 300 च्या पुढे गेली आहे. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. भारताने इंग्लंडवर 280 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे.




















