IND vs ENG: मोहम्मद शमी IN, हार्दिक पांड्या OUT; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 साठी भारताची संभाव्य Playing XI
IND vs ENG 5th T20 Playing XI: पाचव्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs ENG 5th T20 Playing XI: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टी-20 मालिकेतील पाचवा सामना आज म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा सामनाही जिंकून इंग्लंडविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल. पाचव्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात.
भारताने मालिका आधीच जिंकली असल्याने, संघ व्यवस्थापन शेवटच्या टी-20 सामन्यातून काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. गोलंदाजीत भारताकडून वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांनी छाप पाडली असून, चौथ्या सामन्यात हर्षित राणानेही चांगला मारा केला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीकडे सर्वांच्या नजरा आहेत. तिसऱ्या टी-20 सामन्यात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चौथ्या टी-2 सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे आज रंगणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवलाही या मालिकेत चांगल्या धावा करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी सूर्यकुमार यादव प्रयत्न करताना दिसेल.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏#TeamIndia held their composure & sealed a 1⃣5⃣-run victory in the 4th T20I to bag the series, with a game to spare! 🙌 🙌
— BCCI (@BCCI) January 31, 2025
Scorecard ▶️ https://t.co/pUkyQwxOA3 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Jjz5Cem2US
हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता-
हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हे दोघेही एकदिवसीय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग आहेत. वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत 4 सामन्यांत 12 बळी घेतल्याने तो उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे, तर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित असल्याचे दिसते. गेल्या सामन्यात शिवम दुबेच्या जागी बदली खेळाडू म्हणून खेळवण्यात आलेल्या आणि 3 विकेट्स घेणाऱ्या हर्षित राणावरही सर्वांचे लक्ष असेल.
पाचव्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
