IND vs BAN : बांगलादेशने भारताविरुद्ध कधी कसोटी मालिका जिंकली का?; जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी अन् रेकॉर्ड
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे, पण त्याआधी भारत-बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.....
![IND vs BAN : बांगलादेशने भारताविरुद्ध कधी कसोटी मालिका जिंकली का?; जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी अन् रेकॉर्ड IND vs BAN In Test Cricket Most Wins Head-to-Head Records Key Stats And Records Cricket News Marathi IND vs BAN : बांगलादेशने भारताविरुद्ध कधी कसोटी मालिका जिंकली का?; जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी अन् रेकॉर्ड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/14/75f987f525afcc2a494ec0cd4eff574e17263288573141091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs BAN Test Head To Head Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत आणि यापूर्वी अनेक कसोटी मालिकांमध्ये आमनेसामने आले आहेत. आगामी कसोटी मालिकेबद्दल बोलताना दोन्ही देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे, पण त्याआधी भारत-बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.
भारत बांगलादेश कसोटीत हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपर्यंत एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये एक मालिका सोडली तर प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. ती एक मालिकाही अनिर्णित राहिली होती, म्हणजे बांगलादेशला आजपर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
मालिका जिंकली नाही पण अशा परिस्थितीत बांगलादेशने भारताविरुद्धचा कसोटी सामना कधी जिंकला आहे का, असा प्रश्न पडतो. आजपर्यंत झालेल्या सर्व 8 मालिकांमध्ये बांगलादेशला कधीही टीम इंडियाला कसोटी सामन्यात पराभूत करता आलेले नाही.
दोन्ही संघांनी आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 वेळा भारताने विजय मिळवला असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबादमध्ये या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
शेवटच्या कसोटी सामन्यात काय झालं?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटची कसोटी मालिका 2022 मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 188 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात भारताने 3 गडी राखून विजय मिळवला होता. त्या मालिकेत चेतेश्वर पुजारा खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)