IND vs BAN 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; कर्णधार रोहित शर्मासह तीन प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर
IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं.
![IND vs BAN 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; कर्णधार रोहित शर्मासह तीन प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर IND vs BAN 3rd ODI Rohit Sharma, Deepak Chahar and Kuldeep Sen ruled out of third ODI against Bangladesh with injuries IND vs BAN 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; कर्णधार रोहित शर्मासह तीन प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/b0dada391c2f2e5667c69c1eac1b4bd71670478113000266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं मालिकेतील आव्हान संपुष्टात आलंय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 10 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) आणि कुलदीप सेन (Kuldeep Sen) दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी याबाबत माहिती दिलीय.
बीसीसीआयचं ट्वीट-
🗣️ 🗣️ Head Coach Rahul Dravid takes us through the injury status of captain Rohit Sharma, Deepak Chahar & Kuldeep Sen #TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/r6CEj5gHgv
— BCCI (@BCCI) December 8, 2022
राहुल द्रविड काय म्हणाला?
दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाला की, "आमच्या संघातील खेळाडू दुखापतींशी झुंज देत आहेत, जे आमच्यासाठी चिंताजनक आहे. मला वाटतं की, रोहित शर्मा आणि दीपक चाहर अखेरच्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहेत. तर, कुलदीप सेनही मालिकेतून बाहेर पडलाय. रोहित शर्मा मुंबईला परतणार आहे. बांगलादेशविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत तो खेळणार की नाही? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्याच्या दुखापतीबाबत आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळणार नाही, हे स्पष्ट झालंय."
भारतानं एकदिवसीय मालिका गमावली
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघानं महेंदी हसन शतकी आणि महमूदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 266 धावापर्यंतच मजल मारू शकला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
पुन्हा मेहंदी हसन भारतासाठी ठरला विलन
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजनं अनामुल हकला एलबीडब्लू करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये बांगलादेशच्या संघानं दोन विकेट गमावून 44 धावा केल्या. उमरान मलिकनं त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात शांतोला क्लीन बोल्ड करून बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला. सुंदर वॉशिंग्टन सुंदरनं शाकीब हल हसनला झेल बाद केलं. शाकीब अल हसनला 20 चेंडूत 8 धावा करत्या आल्या. बांगलादेशच्या डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टननं रहीम (12 धावा) आणि अफीफच्या (0 धाव) रुपात बांगलादेशच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. तर, उमरान मलिकनं महमूदुल्लाहला आऊट करून भारताला सातवं यश मिळवून दिलं. पण एका बाजूनं विकेट पडत असताना महेंदी हसननं नाबाद 100 धावा) संघाचा डाव सावरला आणि बांगलादेशच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)