Most Sixes In ODI: रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले 500 हून अधिक षटकार
IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला.
IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट पाहायला मिळाले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 266 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यातील अखेरच्या काही षटकात दुखापतग्रस्त रोहित शर्मानं (Rohit Sharma) सामन्याचं रुप बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. हा सामना भारतानं पाच धावांनी गमावला. या सामन्यात रोहित शर्मानं नाबाद 51 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह रोहित शर्मानं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 षटकारांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय आणि जगभरातील दुसरा खेळाडू ठरलाय. वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर 500 हून अधिक षटकारांची नोंद आहे.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 553 षटकारांची नोंद आहे. 502 षटकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीद आफ्रिदीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 476 षटकार लगावले आहे. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम 398 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, मार्टिन गप्टील (383 षटकार) पाचव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार:
क्रमांक | फलंदाज | षटकार |
1 | ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) | 533 |
2 | रोहित शर्मा (भारत) | 502 |
3 | शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान) | 476 |
4 | ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) | 398 |
5 | मार्टिन गप्टील (न्यूझीलंड) | 383 |
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहितचे सर्वाधिक षटकार
रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 256 षटकार लगावले आहेत. तर, कसोटीत 64 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 182 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये शाहीद आफ्रिदी (351 षटकार) टॉपवर आहे. त्यानंतर ख्रिस गेल 331 षटकारासंह दुसऱ्या आणि सनथ जयसूर्या 270 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद आहे.
भारतानं सलग दुसरा एकदिवसीय सामना गमावला
महेंदी हसन शतकी आणि महमूदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून बांगलादेशनं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 266 धावापर्यंतच मजल मारू शकला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
हे देखील वाचा-
KL Rahul Catch: अर्रर्रर्र खतरनाक! उमरान मलिकच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ