Australia Won WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी पराभव
IND vs AUS, WTC Final 2023: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय.
![Australia Won WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी पराभव IND vs AUS WTC Final 2023 Australia won by 209 runs champions against India 2nd Innings Day 5 The Oval Stadium Australia Won WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी पराभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/1e6013d598da708a21492104bc8595e91686483467334625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS, WTC Final 2023: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी विराट पराभव केला. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 234 धाावंवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.
टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
Congratulations, Australia! 🇦🇺
— ICC (@ICC) June 11, 2023
A roaring victory in the ICC World Test Championship 2023 Final 🎉#WTC23 | #AUSvIND pic.twitter.com/VE01bWheMQ
भारतीय संघाचा 10 वर्षांपासून आयसीसी चषक विजायाचा दुष्काल कायम राहिलाय. आज अनेक क्रीडा प्रेमींचे स्वप्नही भंगले. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफीची नोंद झालीय. विशेष म्हणजे, आयसीसीच्या सर्व ट्रॉफी नावावर करणारा ऑस्ट्रेलिया संघ ठरलाय.
Lost in 2014 T20 WC final.
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2023
Lost in 2015 ODI WC Semi.
Lost in 2016 T20 WC Semi.
Lost in 2017 CT final.
Lost in 2019 ODI WC Semi.
Lost in 2021 WTC final.
Lost in 2022 T20 WC Semi.
Final in 2023 WTC final.
Heart break continues for Team India.
भारतीय संघाकडून आघाडीच्या खेळाडूंनी जम बसल्यानंतर विकेट फेकल्या. रोहित शर्मा 43, चेतेश्वर पुजारा 27, विराट कोहली 49 आणि अजिंक्य रहाणे 46 यांनी चुकीचा फटका मारत आपल्या विकेट फेकल्या. याचाच फटका टीम इंडियाला बसला. रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांना खातेही उघडता आले नाही. नॅथन लायनने याने चार विकेट घेतल्या. तर स्कॉट बोलँडने तीन महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. तर पॅट कमिन्सने एक तर स्टार्कने 2 गडी बाद करत भारतीय फलंदाजीचा फडशा पाडला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)