IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने रचला इतिहास, T20 मालिकेत 220 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला नावावर
IND vs AUS : भारतीय संघ टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 220 पेक्षा अधिक धावा करणारा संघ बनला आहे. दरम्यान टी-20 मालिकेत 9व्यांदा भारताने इतक्या धावांची मजल मारली.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) दुसऱ्या टी-20 (T20) सामन्यात भारताने (India) 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरं तर, भारतीय संघ हा टी-20 मालिकेत सर्वाधिक वेळा 220 पेक्षा अधिक धावा करणारा संघ बनला आहे. टीम इंडियाने टी-20 फॉरमॅटमध्ये विक्रमी 9व्यांदा 220 पेक्षा धावा केल्या आगेच. त्याचबरोबर या यादीत भारतानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने T20 फॉरमॅटमध्ये 8 वेळा 220+ धावा केल्या आहेत.
या यादीत भारताशिवाय कोणते संघ?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने टी-20 फॉरमॅटमध्ये 7 वेळा ही कामगिरी केली आहे. त्याच वेळी, इंग्लंडने 6 वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये 220+ धावा केल्या आहेत. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 236 धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वालशिवाय रुतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी अनुक्रमे 53,58 आणि 52 धाव्या केल्या.
भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टी -20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात देखील 44 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलाय ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली होती. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान दिले होते.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेल्या पाॅवरप्लेमधील तुफानी धुलाईनंतर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशानच्या शानदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. टाॅप 3 फलंदाजांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीने ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 236 धावांचे आव्हान दिले. यशस्वी जैस्वालने 53 धावांमध्ये अर्धशतक झळकावले. तर ईशान किशनने देखील 52 धावंची खेळी केली. सूर्याने 10 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग आणि तिलक वर्मा नाबाद परतले. रिंकू सिंगने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा 2 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर नाबाद राहिला.
भारताच्या गोलंदांजांची जादू
भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसीध कृष्णाने प्रत्येकी 3 बळी घेतले. यादरम्यान बिश्नोईने 4 षटकात 32 धावा आणि कृष्णाने 4 षटकात 41 धावा दिल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.