IND Vs AUS | कसोटी सामन्यात सहभाग होणार रोहित शर्मा; BCCI उचलणार 'हे' पाऊल
IND Vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात भाग घेण्यासाठी क्वॉरंटाईनचा काळ रोहित शर्मासमोर मोठी अडचण निर्माण करु शकतो. पण BCCI यातूनही मार्ग काढू शकते.
IND Vs AUS : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांचीच जास्त चर्चा होतेय. भारतीय संघाच्या कसोटी सामन्यांची सुरुवात 17 डिसेंबरपासून होत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोन्ही खेळाडू पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. परंतु अशाही परिस्थितीत BCCI या दोन्ही खेळाडूंचा कसोटी संघात समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे.
रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोन्ही खेळाडू सध्या बंगळुरु नॅशनल क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणीची तयारी करत आहेत. BCCI च्या मेडिकल टीमच्या अंदाजानुसार, या दोन्ही खेळाडूंना दुखापतीतून बरे होण्यासाठी अजून तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दुखापतीतून बाहेर आल्यानंतर रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची मुभा असेल. परंतु ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या कडक नियमांनुसार, या दोन्ही खेळाडूंना 14 दिवस क्वॉरंटाईन रहावे लागणार आहे. त्या दरम्यान त्यांना नेट प्रॅक्टिस करण्याची मुभादेखील असणार नाही.
क्वॉरंटाईन कालावधीमुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यांना मुकावं लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु BCCI ऑस्ट्रेलिया सरकारकडे या दोन्ही खेळाडूंच्या क्वॉरंटाईन कालावधीसंबंधी नियमांमध्ये काही शिथिलता आणण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. असे झाले तर या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या जाणाऱ्या प्रॅक्टिस सामन्यात भाग घेता येणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे तीन कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे भारतीय संघासमोर आव्हान उभं आहे. अशात जर रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांना खेळण्याची संधी मिळाली तर ती संघासाठी दिलासादायक बाब असेल.
पहा व्हिडीओ: IND VS AUS | रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? सिडनीतून गौरव जोशीचा रिपोर्ट
महत्वाच्या बातम्या :